✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

🔺जुन्या वैमनस्यातून घडली घटना

🔺आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

ब्रम्हपुरी(दि.20जुुलै):-खेडमक्ता येथील हत्येची बातमी ताजी अतानाच रविवारला सकाळी 8.30 च्या दरम्यान भरचौकात वयोवृद्ध व्यक्तीने वॉर्डातील एका युकावर धारदार शस्त्राने छातीवर वार करून जखमी केले . जखमी अवस्थेत युवकाला ब्रम्हपुरीतील आस्था दवाखान्यात उपचार सुरू असताना 11.00 च्या दरम्यान युकाचा मृत्यु झाला.ही भयानक घटना ब्रम्हपुरीतील धुमणखेडा वॉर्डातील आहे. मिळालेल्या माहितनुसार मृतक युकाचे नाव रामचंद्र आनंदराव पिलारे (45) असून हा व्यक्ती ब्रम्हपुरीतील धुमणखेडा वॉर्डाचा रहिवासी होता.मृतक युवक नवीन घराच्या बांधकामाला पाणी मारत असताना . आरोपी रामू तुळशीराम बावणे (65) धुमणखेडा वॉर्डाचा रहिवासी असून याने जुन्या वैमनस्यातून अचानक धारदार शस्त्राने युवकावर छातीवर हल्ला करून जखमी केले.

      हे सर्व लोकांना कळताच आजूबाजूच्या लोकांनी जखमी युवकाला आस्था रुग्ण्यालयात ऍडमिट केले . परंतु उपचार दरम्यान युवकाचा मृत्यू झाला.त्या दरम्यान ब्रम्हपुरी पुलिससानी आस्था रुग्णालयात जाऊन पंचनामा केला . व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविला.आरोपीविरोधात कलम 302 नुसार गुन्हा नोंविण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरीचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अश्विन खेडिकर करत आहेत.

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED