पुसद येथे दोन दिवशीय समता दल प्रशिक्षण शिबिर संपन्न

31

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.24मार्च):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संरक्षण विभाग पुसद यांच्या वतीने महाड क्रांती दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पारमिता बुद्धविहार महावीरनगर येथे १९ मार्च ते २० मार्च या दोन दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते.त्या शिबिराचा समारोपीय कार्यक्रम दि.२० मार्च २०२३रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रविजी भगत जिल्हाध्यक्ष हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारत कांबळे माजी सैनिक भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष, तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत खंदारे बौध्दाचार्य, उत्तम श्रीरामे बौध्दाचार्य, नामदेव श्रावणे बौध्दाचार्य, रमेश कांबळे,प्रदिप गायकवाड,धम्मदिप काळबांडे तालुकाध्यक्ष उमरखेड, मिलिंद जाधव,गंगाधर कांबळे, पंजाब बरडे, अशोक धुळे, हे उपस्थित होते तर प्रशिक्षक म्हणून पोर्णिमा भोसले मेजर मुंबई, दर्शना टोणगे मेजर मुंबई, कोमल गरुड डिव्हिजन ऑफिसर मुंबई , अशोक पेरकावार मेजर चंद्रपूर हे उपस्थित होते.

या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.

या समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिरामध्ये १२५ प्रशिक्षणार्थीने सहभाग घेतला होता.या समारोपीय कार्यक्रमाच्या प्रसंगी रविजी भगत यांनी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा महागाव अध्यक्षपदी धारमोहा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बौध्दाचार्य प्रकाश खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली. व सरचिटणीस म्हणून अनिरुद्ध मुरादे तर कोषाध्यक्ष पदी किशोर आळणे यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ल.पु.कांबळे यांनी केले.तर आभार भोलानाथ कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाला भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी मंडळी व समता सैनिक दलाचे पदाधिकारी मंडळी, समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित होते.