फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.25मार्च):-फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन ,पुणे च्या बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे सत्यशोधक समाज स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि.२६ मार्च २०२३ रोजी दु.१२ वा.नाशिक, पंचवटी येथील गोदावरी लॉन्स मध्ये इगतपुरी नगर परिषद चे माजी नगरसेवक सुनील जाधव यांचा मुलगा सत्यशोधक स्वराज जाधव ,BE.MECH आणि नाशिकचे समाजसेवक सुनील माळी यांची मुलगी धनश्री माळी , B.COM, B.Ped या उच्चशिक्षिताचा मोफत ३९ वा .सत्यशोधक सोहळा संपन्न होणार आहे.

या वधू वरांची रजिस्टर नोंदणी करून विधीकर्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम संस्थेचे वतीने भेट देण्यात येणार आहे.तर आई वडील ,मामा मामी यांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र दिले जाणार आहे. यावेळी अक्षता म्हणून तादूळ ऐवजी फुलांच्या पाकळ्या वापरण्यात येणार आहे तर महात्मा फुले रचित मंगलाष्टके चे गायन माळी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष हनुमंत टिळेकर ,पांडुरंग गाडेकर , गोविंद माळी आणि दीपक मंडलिक करणार आहेत.
आयोजक सुनील जाधव म्हणाले की उच्चशिक्षित वधू वर यांनी प्रथम अंधश्रद्धा कर्मकांड याला मूठमाती दिली पाहिजे आणि त्याला कुटुंबाने साथ दिली पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो यासाठी सुनील माळी आणि मुलीचे मामा सी आय.डी ऑफिसर बाळासाहेब खैरे यांनी पुढाकार घेतला .

या सर्वांचे म्हणणे होते कि जो पर्यंत मोठ्या कुटुंबामध्ये सत्यशोधक पद्धतीने विवाह होणार नाहीत तोपर्यंत गरीब कुटुंब याचा विचार करणार नाही .पुढे ते म्हणाले की महात्मा फुले यांनी ही प्रथा १५० वर्षापूर्वी सुरु केली परंतु उच्चवर्णीयांचे मुळे अनिष्ठ प्रथा ,आर्थिक उधळपट्टी वाढल्याने ही प्रथा पाहिजे तशी रुजली नाही या मुळे अनेक लोक कर्जबाजारी होऊ लागले.याला आळा घालण्यासाठी आगोदर आपल्या घरापासुन सुरुवात केली तर याचे प्रबोधन होईल असे देखील जाधव, माळी, खैरे, व समाधान जेजुरकर म्हणाले.

याकामी सातत्याने फुले एज्युकेशनचे बहुद्देशीय सत्यशोधक केंद्र महारष्ट्र आणि तेलगाना राज्यात नियमित काम करीत असून फुले शाहू आंबेडकर यांचे कृतीशील आचार – विचाराचे बीज पेरत असून लवकरच ५० सत्यशोधक विवाह झालेचे पुस्तक प्रकाशित करणार आहेत. राजस्थान, इंदोर आणि हरियाना राज्यात देखील हे कार्य घेऊन जाणार आहे असे ढोक यांनी सांगितले. पुढे ढोक यांनी असे देखील सांगितले की पुणे (वडगाव) आणि सातारा (वावरहिरे) या ठिकाणी सर्व आधुनिक सोयी सुविधासह सत्यशोधक विवाह करण्यासाठी मोफत बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रामध्ये सन्मानपुर्वक सोय केली असून समाजाने सामुदायिक सत्यशोधक विवाहासाठी देखील सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED