जागतिक क्षयरोग दिवस आरोग्य विभाग पंचायत समिती खेडच्या वतीने साजरा करण्यात आला

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)

खेड(दि.24मार्च):- तालुका क्षयरोग पथक खेड आरोग्य विभाग पंचायत समिती खेड व skoda Volkswagen auto India pvt LTD मार्फत प्रधान मंत्री टीबी मुक्त भारत अभियनांतर्गत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षय रुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.यावेळी skoda Volkswagen auto India pvt LTD चे श्री रामहरी कुटे HR Head, श्री संजय खरे environment Head , खरे मॅडम ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ पारखे मॅडम वैद्यकिय अधिक्षक डॉ महेंद्र गरड सर डॉ मनोज पवार.डाॕ जालिंदर बोर्डे,यांनी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले.

यावेळी संपूर्ण तालुक्यातील सुमारे 450 क्षय रूग्णांना पोषण आहाराचे वाटप ग्रामीण रुग्णालय चांडोली, ग्रामीण रुग्णालयात चाकण व प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव या तीन ठिकाणी करण्यात आले. यावेळी प्रत्येक रुग्णाला तांदूळ 3 किलो, शेंगदाणे 1 किलो,डाळ 1.5 किलो, खाद्य तेल 500 gram या प्रमाणे प्रत्येकी किटचे वाटप करण्यात आले.किट मिळाल्याने प्रत्येक रुग्णाच्या चेहर्यावर समाधान दिसून येत होते.तालुका आरोग्य अधिकारी डॉ इंदिरा पारखे मॅडम यांनी सांगितले की सर्व रुग्णांच्या आरोग्यासाठी लागणारी मदत आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. *माननीय मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा प्रतिनिधी*

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED