28 ते 31 मार्च रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

76

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.25मार्च);- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दि. 28 ते 31 मार्च 2023 या कालावधीत पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करून किंवा ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेली असेल त्या उमेदवारांनी अप्लाय करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती :

www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा प्ले-स्टोअर मधुन महास्वयंम अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा व एम्प्लॉयमेंटवर क्लिक करा. एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब सिकर हा पर्याय निवडून नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साइन इन करा. नंतर होम पेजवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर हा पर्याय निवडा. चंद्रपूर जिल्ह्याची निवड करुन फिल्टर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर-चंद्रपूर या ओळीतील अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटणावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करा. आयअॅग्री हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार जुळणारे विविध आस्थापना, कंपन्यांच्या रिक्त पदांच्या अप्लाय बटनावर क्लिक करा.

सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगईन करुन दि. 28 ते 31 मार्च 2023 रोजी वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे आणि उद्योजकांसोबत व्हॉट्सॲप, गुगल मिट, व्हिडीओ कॉलींग आदींच्या माध्यमातुन संपर्क साधुन ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.