ब्रम्हपुरीतील वृत्तपत्रात गाजतोय के.बी. नावाचा रेती माफिया दलाल

98

🔸प्रशासन कारवाई करून आणणार का के. बी. नावाचा चेहरा समोर?

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 26 मार्च):- तालुक्यातील सध्याचा चर्चेचा विषय म्हटलं की तालुक्यामधील अवैद्य रेती. हळदा, रनमोचन, आवळगाव, बोढेगाव, सोंन्द्री, खरकाडा, बोळा, अर्हेर- नवरगाव या रेतिघाटातून मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती सतत उत्खनन होत आहे. यातील दुवा ही के. बी. नावाच्या दलालाची असल्याची खुलेआम वृत्तपत्रात छापून येत आहे. परंतु के. बी. नावाचा दलाल सरकारला चुना लावणारा कोण असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.

या के. बी. नावाच्या रेती माफिया दलालाचा खुलासा ब्रम्हपुरीचे प्रशासन लवकर करेल काय की असाच या दलाल ला पैश्याचा जोरावर खुल्या सांडसारख सोडून देईल अशी जोरदार चर्चा जनसामान्यात रंगत आहे. कित्येक दिवसा पासून अवैद्य रेती उत्खनन सुरू आहे. शेतकरी रेती माफियांमुळे ग्रस्त आहेत. सामान्य नागरिक हैराण आणि भीतीमय प्रवास करत आहेत. अवैद्य रेतीच्या वळदळीने रस्त्याचे बेहाल झाले आहेत.

कित्येक निवेदन तहसीलदार, संबधीत अधिकाऱ्याकडे देण्यात आले आहेत. अवैद्य रेतीच्या उपसा बद्दल वृत्तपत्रात बातम्यांवर बातम्या छापून येत आहेत. तरी सुद्धा रेती माफियावर कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सामान्य जनते सामोर एकाच प्रश्न चर्चेत आहे की, प्रशासन रेती माफिया सोबत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेती माफियावर संबंधित अधिकाऱ्यांनी लवकर कारवाई करून सरकारचा मोठ्या प्रमाणात बुडणारा महसूल वाचवावा तसेच जनसामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी जनतेकडून होत आहे.