सावत्र वडिलाच्या बलात्कारामुळे मुलगी गर्भवती

13

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपुर(दि.20जुलै):-नराधम सावत्र वडिलाच्या बलात्कारामुळे एक १६ वर्षीय मुलगी गर्भवती राहिली व तिने एका बाळाला जन्म दिला. ही धक्कादायक घटना गणेशपेठ पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.

पीडित १६ वर्षीय मुलगी आईसह राहायची. तिचे खरे वडील १० वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेले. त्यामुळे तिच्या आईने एका युवकाशी घरोबा केला. त्यावेळी मुलीचे वय  ९ वर्षे होते. त्याने मुलीला सांभाळण्याची तयारी दर्शविली.

दोघेही पती—पत्नीप्रमाणे राहू लागले. मात्र, आरोपीची नजर मुलीवर होती. मुलगी १५ वर्षांची झाल्यानंतर   त्याने तिच्याशी अश्लील चाळे करणे सुरू केले. पत्नी घरी नसताना तिच्याशी लगट करीत होता. सप्टेबर २०१६ मध्ये त्याची पत्नी गावी गेली असता त्याने झोपेत  मुलीवर बलात्कार केला. तेव्हापासून तो डिसेंबर २०१९ पर्यंत तिच्यावर बलात्कार करीत होता. यातून तिला गर्भधारणा झाली. एक दिवस तिचे पोट दुखायला लागले.

तिच्या आईने तिला मेयो रुग्णालयात दाखल केले असता ती गर्भवती असल्याचे समजले. मुलीने आईला सर्व हकिगत सांगितली. गर्भ पाच महिन्यांचा झाल्याने गर्भपात होऊ शकला नाही. मार्च २०२० मध्ये तिने एका बाळाला जन्म दिला.

दरम्यान आता बाळासमोर कुणाचा नाव लावायचे, हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी नराधम सावत्र वडिलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली.