बलगवडे येथे लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज सुरु करणार: केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना रामदासजी आठवले

32

🔸मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पीपल्सचे मेडिकल कॉलेजसाठी ही आग्रह धरू

✒️इसलामपूर प्रतिनिधी(इकबाल पीरज़ादे)

सांगली(दि.26मार्च);- जिल्ह्यातील बलगवडे ता तासगाव येथे लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज सुरु करणार असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना रामदासजी आठवले यांनी केले.ते बलगवडे गावातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. ग्रामपंचायतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्यूकेशन संस्थेच्या विधी महाविद्यालय दिलेल्या जागेची पहाणी करून वृक्षारोपण केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजयकाका पाटील होते.

तर रिपाई नेते विनोद निकाळजे, प्रदेश उपाध्यक्ष विवेकराव कांबळे, पत्रकार राजा आदाटे, नगरसेवक जगन्नाथजी ठोकळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे, बहुजन नेते भिमरावभाऊ भंडारे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, माजी उपसभापती जयवंत माळी आदी प्रमुख उपस्थित होते.केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदासजी आठवले व खासदार संजयकाका पाटील यांच्या शुभ हस्ते गावातील चार कोटी सत्तर लाख रुपयांची विकास कामे लोकार्पण करण्यात आली, नियोजित लॉ कॉलेजच्या जागेची पहाणी केली.

खासदार संजय काका पाटील म्हणाले, केंद्रीय मंत्री आठवले साहेबांच्या खात्याकडून जास्तीत निधी सांगली जिल्ह्यातील जनतेसाठी खेचून आणावा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु होणारे कॉलेज तालुक्यातील व जिल्ह्यातील जनतेच्या फायद्याचे होईल.लोकसभामतदार संघाचे जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे यांनी प्रस्ताविक केले तर स्वागत अनिल पाटील यांनी केले.यावेळी पत्रकार राजा आदाटे,विनोद निकाळजे विवेकराव कांबळे,आदींची भाषणे झाली.यावेळीअनिसचेसंपादक राहुल थोरात, वकील संघटना अध्यक्ष अतुल डांगे माजी जिप सदस्य सतीश पवार, भाजपा तालुकाध्यक्ष जिप माजी सदस्य सुनील पाटील, मोहनराव पाटील, शिवसेनेचे प्रदीप माने,ऍड स्वप्नील पाटील, अविनाश पाटील, रघुनाथ पाटील, सुरेश थोरात, सरपंच हणमंत शिंदे, उपसरपंच सचिन पाटील, कांतीलाल पाटील, अनिल शिंदे, इंजिनियर किरण पाटील चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले तर शेवटी आभार चार्टर्ड अकाउंटट विष्णू तोडकर यांनी मानले.
————–
*फोटो ओळी—सांगली जिल्ह्यातील बलगवडे कार्यक्रमात भाषण करताना केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले, व्यासपीठावर खासदार संजयकाका पाटील, रिपाई सांगली लोकसभा जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे, विनोद निकाळजे, विवेकराव कांबळे माजी सरपंच अनिल पाटील व इतर मान्यवर*