मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात १३ रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया !

29

🔸हर्णीया, हायड्रोसील रूग्णांना मिळाला दिलासा !

🔹वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांचे रुग्णांनी मानले आभार !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.26मार्च):-उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनखली घेण्यात आलेल्या आरोग्य तपासानी शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यातील निवडक रुग्णांवर टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्यानुसार हर्णीया, हायड्रोसील, हरनिया, हायडोसिल, अमबिलिकल हर्निया यासारख्या रुग्णावर महात्मा ज्योतिरव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे रविवार दिनांक २६ मार्च रोजी १३ रुग्णांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आल्याची माहिती मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांनी दिली.

मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांच्या पुढाकाराने शस्त्रक्रिया शिबिरे मोठ्या प्रमाणात संपन्न होत असून त्याचा शेकडो रूग्णांना फायदा होत असून रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी खर्च करावे लागणारे हजारो रुपये वाचत असून रूग्णांना दिलासा मिळत असल्यामुळे सर्व रूग्णांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचे आभार मानले.

मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय आयोजित शिबिरात तब्बल १३ सामान्य रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार, सर्जन डॉ प्रविण बिजवे, डॉ राहुल खन्ना, भुलतज्ञ डॉ. जगदीश काळभोर, डॉ रमेश डकरे, उपस्थीत होते. शस्त्रक्रिया शिबिर जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.bदिलीप सौदंळे, डॉ प्रशांत घोडाम, डॉ. रणमले, डॉ सुमेध चत्से, डाॅ भिसे, सुशिल तिवारी यांचे मार्गदर्शना खाली पार पडले तसेच उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील डॉ सचिन कोरडे, मीनाक्षी वागारे, रूथ लोखंडे, सुजित वानखडे, रेश्मा बहुरूपी, वाष्णवी जोशी, प्रवीण कापडे, सतीश देवगडे, कमला तायवाडे, सागर झटाले, महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना वरुड व मोर्शी येथील वैद्यकीय समन्वयक डॉ घनश्याम मानकर, वशीम शेख, प्रकाश पांडे, सुजाता पांडे, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेकरीता अथक परीश्रम घेतले. शिबिराचे समारोप रुग्णांच्या वैयक्तिक भेटी घेऊन व सविस्तरपणे माहिती देऊन करण्यात आला.

गर्भ पिशवी, हर्णीया, हायड्रोसील इतर शास्त्रक्रिये करिता नोंदणी करावी !मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णांची तपासणी करून टप्प्या टप्प्याने रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत असून गर्भ पिशवी, हर्णीया, हायड्रोसील इतर शास्त्रक्रिये करिता नोंदणी करून या सारखे आजार असलेल्या सर्व रुग्णांनी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात येऊन तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया करून घ्यावी — डॉ प्रमोद पोतदार वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मोर्शी.