तलवाडयात महाप्रसाद व स्वामी इंद्रदेवेश्वरानंद महाराज यांच्या दर्शनाने श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता

42

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.27मार्च):- तालुक्यातील तलवाडा येथे श्री श्री १००८ स्वामी श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज (राधाकिशोरी सेवाधाम वृंदावन) यांच्या अमृततुल्य वाणीतून सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेची रविवार दि.२६ मार्च २०२३ रोजी सांगता झाल्यानंतर हजारो भाविकांनी स्वामीजींचे दर्शन घेतले आणि त्यानंतर महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. रविवारी हजारो पुरूष, महिला व अबालवृद्ध यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून मोठया उत्साहात आनंद द्विगुणित केला.

रविवारी सकाळी ठिक ९ ते ११:३० यावेळेत श्रीमद् भागवत कथेचे निरूपण यज्ञपीठाधीश्वर राष्ट्रीय संत श्री श्री १००८ स्वामी श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून संपन्न झाल्यानंतर हजारो भाविकांनी स्वामीजींचे दर्शन व आशिर्वाद घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी तलवाडा व परिसरातील हजारो भाविक-भक्त तसेच विशेष करून महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. यावेळी स्वामी श्री इंद्रदेवेश्वरानंद महाराज यांनी कार्यक्रमाच आयोजक व त्यांचे सहकारी मित्र मंडळ तसेच तलवाडा व पंचक्रोशीतील भाविकांचे मनोभावे कौतुक केले.

आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी आई-वडीलांनी विशेष काळजी घ्यावी व गैरमार्गाने कमावलेला पैसा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च न करता कष्टाने प्राप्त झालेले पैसे त्यांच्या शिक्षणावर खर्च केले तर कुटुंबाचे आणि मुलांचे देखील निश्चितच कल्याण होईल असे स्वामी श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी सांगता समारंभप्रसंगी कथेचे निरूपण करताना आवर्जून सांगितले. प्रत्येकाने मांसाहार व व्यसनापासून अलिप्त रहावे असे आवाहन देखील त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्माजी महाराज यांनी केले.