“सुगंधयात्री” चे प्रकाशन…

✒️पुसद प्रतिनिधी(स्वप्नील गोरे)

पुसद(दि.27मार्च):- येथिल जेष्ठ कवि पुंडलिकराव भेंडे यांच्या सुगंधयात्री या तिसर्‍या काव्यसंग्रहाचे विमोचन विगुरंळा जेष्ठ नागरीक हाॅल मोतीनगर येथे संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यअतिथी म्हणुन अमरावती येथिल कवि राजेश चौरपगार उपस्थित होते याप्रसंगी त्यांनी कवि हा समाजचिंतक असतो असे भावोद्गगार काढले. कविची दृष्टी ही समाजातील कमतरता व दु:ख दुर करण्यासाठी झटत असतो असे सुद्धा पुंडलिक भेंडे यांच्या कवितेवर भाष्य करतांना उद्गगार काढले. या प्रकाशन सोळळ्यात शाम जोशी, तसेच इतरही त्यांच्या मित्रांनी कवितेचे कौतुक केले.

पत्रकार पाटील यांनी अनेक अनुभव सांगीतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ. प्रल्हाद वावरे यांनी केले. पुंडलिक भेंडे यांच्या कवितेची वाटचाल मांडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती येथिल सामाजिक कार्यकर्ते कर्नल लक्ष्मणराव गाले यांनी सुद्धा त्यांना पुढील काव्यलेखन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ नागरिक मंडळाचे सचिव शाम जोशी व सावरकर यांनी अथक परिश्रम घेतले. सुगंधयात्री या संग्रहाचे कार्यक्रमाचे संचालन रायपूरकर यांनी केले. सर्वांनी शुभेच्छा देऊन पुढील लेखनप्रवासास शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED