SRA मध्ये घर देतो म्हणून बौद्ध विधवा वृद्ध महिलेची फसवणूक

(पोलिसात तक्रार, SC आयोगाकडे धाव, ऍट्रॉसिटीची मागणी)

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.27मार्च):- एसआरए मध्ये घर मिळवून देतो म्हणून बौद्ध विधवा व वृद्ध महिलेला लाखो रुपयांचा गंडा घालून फसवणूक केली असल्याची तक्रार पोलिसात तर SC आयोगाकडे धाव घेतली असून ऍट्रॉसिटी ची मागणी करण्यात आली आहे.*

अंगद सूर्यवंशी व मुकेश भंडारी या दोघांनी सांगनमताने नुकतीच विधवा झालेल्या बौद्ध वृद्ध महिलेची एसआरए मध्ये घर देतो म्हणून (23,50,000/-) साडे तेवीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

अंदाजे 4 ते 5 वर्षा खाली अंगद सूर्यवंशी या दलाला ने मुकेश भंडारी यांच्या शी सांगनमत करून विभक्त जीवन जगणाऱ्या वृद्ध महिलेस घर देतो असे खोटे आमिष देऊन फसवल्याचा प्रकार अंधेरी एम आय डी सी परिसरात घडला आहे. कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी मनोज दराडे प्रकरणाची चौकशी करत आहेत.

4 वर्षांपासून मुकेश भंडारी अंगद सूर्यवंशी च्या मदतीने आजपर्यंत घर देतो घर देतो म्हणून फसवत आला असून काही महिन्याखाली एका घर कायम राहण्यासाठी दिले असे कळते पण त्याही मालकाला त्या घराची रक्कम पूर्ण न दिल्याने दुहेरी फसवणुकीचा गुन्हा अंगद सूर्यवंशी व मुकेश भंडारी यांच्यावर नोंदण्याची शक्यता आहे.

मुकेश भंडारी हा मागील अनेक वर्ष पासून लोकांना भुलथापा देऊन त्यांची आर्थिक लयलूट करत असल्याचे समजते. बाई बाटली आणी सट्टा या वाईट सवयीमुळे मुकेश भंडारीला लोकांचे पैसे गडपण्याची सवय लागल्याचे बोलले जाते.

मुकेश भंडारी याने बऱ्याच लोकांचे पैसे घर देतो म्हणून घेतले असल्याचे कळते, अशीच काही प्रकरणे न्याय प्रविष्ठ असून अजून काही प्रकरणे हाती लागतात काय याचा तपास पोलीस करत आहेत.

महाराष्ट्र, मागणी, मुंबई, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED