जुनासुर्ला येथे रक्तदानाची परंपरा कायम

59

🔸स्वयंस्फूर्तीने युवक -युवती करतात रक्तदान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.28मार्च):- मूल तालुक्यातील जुनासुर्ला गावात सरपंच रंजित समर्थ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केल्या जाते . तीच परंपरा कायम राखत यावर्षी २७ मार्च २०२३ ला गावातील ५० युवकांनी रक्तदान करीत राष्ट्रीय कार्यात आपले योगदान सिद्ध केले आहे . रक्तदान श्रेष्ठदान या आवाहनाला प्रतिसाद देत जुनासुर्ला गावचे धडाडीचे नेतृत्व सरपंच रंजित समर्थ यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी वासुदेव पा.समर्थ,वंदना अगरकाटे, मुन्ना भाऊ कोटगले,सुभाष देशमुख,खुशाल टेकाम उपसरपंच,राजू गोवर्धन ग्रा.पं. सदस्य, गणेश खोब्रागडे, ग्रा.प. सदस्य, निलेश देशमुख, तुळशीराम उप्रिकार,दुर्योधन सोपनकार, विनोद मामगिरवार, इंदिरा गांधी हायस्कूल जुनासुर्लाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळा जुनासुर्ला येथील सर्व शिक्षक वृंद व गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले . या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून इतरांना प्रेरणा देणारे असल्याची सर्वत्र चर्चा आहे .