अभिनेता प्रसाद सोनवणे अडकणार लग्नबंधनात…..

56

✒️धुळे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

धुळे(दि.28मार्च):-प्रतिनिधी मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू आहे. एका पाठोपाठ एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतंच कलाकार प्रसाद सोनवणेने यांनी देखील गुपचूप साखरपुडा उरकला आहे.“एका नव्या प्रवासाची सुरवात आज पासून झाली आहे. आणि ती आयुष्यभर राहील. त्यासोबतच आता पर्यंत तुमचं मिळालेले प्रेम आशीर्वाद शुभेच्छांसह आम्ही आमचा एकत्र प्रवास सुरु करतोय. असे त्याने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे. प्रसादने सुनीता सोबतचे साखरपुड्यातील काही फोटो शेअर केले आहेत.

घराघरात पोहोचलेला प्रसादने 2013 मध्ये मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली. शाळा-कॉलेजपासूनच त्याला अभिनयाची आवड होती. हळूहळू नाटक, एकांकिका, सिनेमे याबद्दल त्याला अधिक उत्सुकता वाटू लागली. मग स्वतः अभ्यास करून, वेगवेगळे प्रयोग करून त्यानं अभिनयकौशल्य आत्मसात केलं. कलाक्षेत्रात पदार्पण करताना सुरवातीला अहिराणी बोली भाषेतील गाणे केले. 2015 साली अहिराणी भाषेतील गाणे भोया भगत , डफणा तालवर , या गाण्यांमुळे प्रसादला लोकप्रियता मिळाली. पुढे त्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. चित्रपट, मालिका, वेब सिरिज अश्या अनेक माध्यमातून पडद्यावर झळकला. तसेच दिग्दर्शक, निर्माता म्हणून देखील कार्यरत आहे.

सध्या तो रेडियो विश्वास 90.8, नाशिक येथे आरजे म्हणून कार्यरत आहे. सुनीता साळुंखे हिच्याशी २७ मार्चला साखरपुडा केला. सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत प्रसादने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच अभिनेता प्रसाद सोनवणे याने लवकरच एक नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार आहे. आणि हा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येतांना माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असेल असं देखील म्हणाला.