उदयकुमार पगाडे यांना “द रिअल सुपर हीरोज २०२०” पुरस्कार

6

✒️रोशन मदनकर (ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी) मो. ८८८८६२८९८६

ब्रम्हपुरी (दि. 20 जुलै) : ब्रम्हपुरी येथील उदयकुमार सुरेश पगाडे यांना कोविड-१९ च्या महामारीच्या काळात महत्त्वपूर्ण कामानिमित्त “द रिअल सुपर हीरोज २०२०” पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार फॉरएवर स्टार इंडिया अवार्ड्सच्या वतीने देण्यात आला.

देशात कोविड- १९ च्या काळात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणा-या योद्धाना फॉरएवर स्टार इंडिया अवार्ड्सच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे असे फॉरएवर स्टार इंडिया अवार्ड्सचे सीईओ एस्ट्रो राज (राजेश अग्रवाल) यांनी जाहीर केले होते. त्यामध्ये ब्रम्हपुरी येथील उदयकुमार सुरेश पगाडे यांचे नाव “द रिअल सुपर हीरोज २०२०” पुरस्काराकरिता घोषित झाले होते. नुकताच त्यांचा सन्मान करण्यात आला. उदयकुमार पगाडे यांना “द रिअल सुपर हीरोज २०२०” पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदन केले.