उमरखेड येथे शांतता समितीची बैठक संपन्न

33

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 28 मार्च):-येणाऱ्या काळातील सार्वजनिक सन उत्सव साजरे करतांना हे शांततेत तसेच जातीय व धार्मिक सलोखा वृद्धिंगत राखून पार पडावे यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याच्या पुढाकारात मंगळवार, 28 मार्चला दुपारी 12 वाजता राजस्थानी भवन येथेशांतता समीतीची बैठकीचे आयोजन केले होते.

श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद असे सार्वजनिक सन उत्सव साजरे होणार असून या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये… याची दक्षता व मिरवणूकीत येणाऱ्या अडचणी सोडवता यावे यासाठी प्रशासना बरोबर चर्चा करुन , त्या सोडविण्याच्या उद्देशातून शांतता समीतीचे सदस्य व उत्सव समीतीचे पदाधिकारी यांनी आपले विचार या सभेत व्यक्त केले.

सार्वजनिक मिरवणूकीच्या रस्त्यावर अस्तवेस्त पडून असलेले साहित्य उचलावे, रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता व्यवस्थित करावा, विद्दुत पुरवठा खंडित होता कामा नये अश्या वाजवी सुचणा प्रशासनाला देऊन त्या तात्काळ सोडवा…अशी विनंती शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली.

तर पोलिसांकडून कायदेशीर सुचणा देत, मिरवणूकीच्या मार्गावर सिसिटीव्ही कॅमेरे राहणार असून उत्सव दरम्यान कोणताही आक्षेपार्ह मजकूर व्हायरल होता कामा नये याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पवन बनसोड साहेब (पोलीस अधिक्षक यवतमाळ) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नामदेव ससाणे (आमदार उमरखेड), प्रदीप पाडवी (उपविभागीय पोलीस अधिकारी,उमरखेड तहसिलदार देऊळगावकर, नितिन भुतडा व सर्व पत्रकार व शांतता समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

चौकट- आक्षेपार्ह मजकूराचा परिणाम मिरवणूकांवर होता कामा नये

यांचे आवाहन विविध धार्मिक उत्सवात एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही असा मजकूर शोसल मिडियावर व्हायरल करु नये आणि यावरुन कोणताही परिणाम मिरवणूकांवर पडता कामा नये, पोलीस हे दरवर्षीच बंदोबस्त करतात आमचा तसा अनुभव आमचा आहे. परंतू कोणताही वाद हा पोलीसांचा हस्तक्षेप न करता तो आपसातच मिठवता आला पाहीजे इतकीच अपेक्षा आहे.

आम्हाला एकच काळजी आहे कुठे तरी एखादा प्रकार घडतो त्याचा परिणाम सण उत्सवावार होता कामा नये.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानना शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन उमरखेड शहराची ठाणेदार अमोल माळवे साहेब यांनी केले.

यावेळी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार बंधू येणाऱ्या सण उत्सवाचे सर्व पदाधिकारी व सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.