सकाळच्या प्रहारी, माटेगावकर कार्यकर्त्यांच्या दारी

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29मार्च):-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम-राम करून आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे नेतृत्व स्विकारलेले युवा वक्ते संदीप माटेगावकर यांनी गावोगावी मित्र मंडळ पदधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व बैठकांचा धडाका लावला आहे. त्यामुळे सकाळच्या प्रहारी माटेगावकर कार्यकर्त्यांच्या दारी असे चित्र गंगाखेड विधानसभेत पाहायला मिळत आहे.

आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या कामाचे प्रभावित होऊन वक्ते संदीप माटेगावकर यांनी मागील जानेवारीत हातातलं घड्याळ सोडून आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळात प्रवेश केला आहे.‌ मात्र, कमी काळात त्यांनी केलेले संघटन कौशल्य आणि भाषणातील आक्रमक शैलीमुळे आ.डॉ.गुट्टे यांनी माटेगावकर यांच्यातील गुण हेरून त्यांची मित्र मंडळाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड केली आहे.
त्यामुळे अधिक जोमाने माटेगावकर कामाला लागले आहेत. आपला छोटासा व्यवसाय सांभाळून ते मित्र मंडळाच्या वाढीसाठी वेळ देत आहेत. त्यासाठी त्यांनी गावोगावी दौरे सुरू केले आहेत. प्रत्येक गावात ते भेटीगाठीसह बैठकांवर भर देत आहेत. त्यामुळे आ.डॉ.गुट्टे यांचे काम, विचार, निर्णय, योजना, कामगिरी जनमाणसात पोहोचण्यास मदत मिळत आहे.

सध्या सहकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीत जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर यांच्या बैठका व दौऱ्याचा फायदा आ.डॉ.गुट्टे यांना होईल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
संघटन मजबूत करणे हेचं उदिष्ट – माटेगावकर
मित्र मंडळाच्या वरिष्ठ पदधिकाऱ्यांना सोबत घेऊन आ.डॉ.गुट्टे यांचे काम मतदार संघाच्या घराघरात पोहोचविणे कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यासाठी संघटन मजबूत करणे हेचं उदिष्ट असल्याचे मित्र मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख संदीप माटेगावकर यांनीसांगितले.