


🔹तांबे नामक पोलीस अधीकारी करतात रिक्षाची खुलेआम वसुली
✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)
बीड(दि.30मार्च):-तालुक्यातील चौसाळा येथील बसस्थानक हे अवैध धंदयाचे माहेर घर बनले असून खुलेआमपणे चौसाळा बसस्थानक शेजारी हातभट्टी नावाची दारू विकली जात असुन याकडे दारूबंदी विभागसह पोलीस प्रशासन बघायची भुमिका घेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतुन नाराजीचा सुर उमटत आहे.
मेढंर भरल्यागत रिक्षातुन अवैध वाहतुक केली जात असुन याची आर्थिक देवाण घेवाण तांबे नामक पोलीस खुलेआमपणे करतात तसेच चौसाळा शहरातील विविध भागात अवैध दारूचे दुकाने खुलेआमपणे चालविले जात असुन युवा पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर असुन याकडे जिल्हापोलिस अधीक्षक लक्ष घालणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.