३१ मार्च पासुन चिमुरात श्री रामायण अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

35

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.30मार्च):- हनुमान मंदिर कमेटी नेहरु वार्ड चिमुरच्या वतीने दिनांक ३१ मार्च ते ८ एप्रील पर्यंत हनुमान मंदिर, हजारी मोहल्ला, चिमुर येथे अखंड रामकथा सप्ताहाचे आयोजन केले असुन यामध्ये रामकथा प्रवचनकार ह. भ. प. रामकृष्ण महाराज बंडे (अकोला) हे पुर्णवेळ सहभागी होणार आहेत.

३१ मार्च ते ८ एप्रीलच्या दरम्यान काकडा, भजन, रामकथा, हरिपाठ, हरिकिर्तन, गजानन विजय ग्रंथ पारायण या दैनंदिन कार्यक्रमासोबतच ह. भ. प. महादेव भानुप्रिया महाराज अकोला, रामकृष्ण बंडे महाराज अकोला, वासुदेव महाराज खोले गुरुजी वरुड जळका, खडसे महाराज बाभुळगाव, पुंडलिक इखार महाराज वर्धा, मुनेताई व खडसे महाराज अकोला, पुरुषोत्तम बंडे बाल किर्तनकार आळंदी, रामकृष्ण बंडे महाराज अकोला आदींचे ग्रंथ पारायण व कीर्तन होणार आहे.

या सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन ईश्वर गोठे, किसन गोठे, तुषार हजारे, गुलाब हजारे, किसन मेहरकुरे, उमेश झाडे, शालीक हजारे, किसन दंडारे, सुधाकर मेहरकुरे, पांडुरंग गायधनी, राजु झाडे, सिंधु हजारे, रमेश मेहरकुरे, मनोहर सातपुते, प्रशांत हजारे, योगेश बारापात्रे, कांता वैद्य, नंदु कामडी, अमोल हजारे, नथ्थु हजारे, अरुण मेहरकुरे, लता हजारे, आशिष हजारे, गुरु बंडे, पुरुषोत्तम बंडे, सुरेश बंडे, प्रमोद बंडे, विलास बंडे, दिनेश निखाते, दौलत बंडे, भरत अगडे, प्रमोद बंडे आदीने केले आहे.