रामकृष्ण या दोन नामांचे नित्य स्मरण करुन आपली आपल्याला सोडवणूक करता येईल व संसार बंधनातून मुक्त होता येईल. : ह.भ.प. श्री.प्रशांत महाराज क्षीरसागर

34

✒️प्रतिनिधी चौसाळा(विवेक कुचेकर)

चौसाळा(दि.31मार्च):-अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या निमित्त पहिल्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा ह.भ.प.श्री.प्रशांत महाराज क्षीरसागर( विसाव्या शतकातील महान संत विभूति वै. ह.भ.प. श्री.ज्ञानेश्वर माऊली दादा महाराज,श्री क्षेत्र चाकरवाडी येळंब घाट ) यांची झाली.

रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी ।ह्रदयमंदिरीं स्मरे कारे ॥१॥आपुली आपण करा सोडवण ।संसारबंधन तोडी वेगीं ॥२॥ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्णमाळा । ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्तिरया ॥३॥ रामकृष्ण या दोन नामांचे नित्य स्मरण करुन आपली आपल्याला सोडवणूक करता येईल व संसार बंधनातून मुक्त होता येईल.हृदय मंदिरी श्रीमूर्तीचा जिव्हाळा असल्याने ध्यानात रामकृष्ण माळा जपतो असे माऊली सांगतात.या अभंगावर त्यांनी अतिशय समाज प्रबोधन सुंदर असे चिंतन या ठिकाणी केलं. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणे ही काळाची गरज हीच खरी संपत्ती. या अभंगावर चिंतन करत असताना नरदेह दुर्लभ आहे तो नाशिवंत असून क्षणभुंगुर आहे. तरीही ईश्वराची परमक कृपा प्राप्त करण्याचे एकमेव साधन आहे.

स्वहित साधावयाचे असेल हा भवशिंदू पार करायचा असेल. तर सद्गुरू कृपा व संतांची संगत लावायला हवी त्यासाठी सत्संगाची आवड धरावी ऐच्छिक सुख व फार लौकिक चौक यातील भेद डोळ्यासमोर जाणून घेऊन यहलोकीच्या प्रलोभनाला बळी न पडता ईश्वर प्राप्तीचे अंतिम ध्येय साध्य करणे यातच नरदयाची किती कर्तव्यात आहे या गोष्टीचा विचार मनाने क्षणोक्षणी करावा जो जाणतो हा देह क्षणभंगुर आहे पुढचा श्वास आपण घेऊच याची श्वास होती नाही म्हणून माणसाने देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी धरावी प्रत्येकाने प्राधान्याने परमार्थ परमार्थाची खासदारावी विषयाची असते.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .खरा वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार सबंध महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर नव्हे तर देशभर वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांनी केला. एक गोष्ट लक्षात घ्या प्रपंच होत राहतो. परमार्थ करावा लागतो. या जन्माचे सार्थक करून घेण्याचा विचार माणसाने क्षणोक्षणी करावा हा विचार प्रबळ होण्यासाठी संत सहवासाची आवड असली पाहिजे त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या कृपेने भगवंताची कृपा आपल्यावर होईल यात संशय नसल्याचे प्रतिपादन ह.भ.प. श्री.प्रशांत महाराज क्षीरसागर यांनी केले. त्यांना कीर्तनाची साथ देण्याकरिता वै.ह.भ.प.रामहरी बाबा सुसंस्कार आश्रम भजनी मंडळ वानगाव फाटा ,चौसाळा व पंचक्रोशीतील भजनी मंडळयांनी कीर्तनामध्ये साथ केली.

शेवटी रामकृष्ण या दोन नामांचे नित्य स्मरण करुन आपली आपल्याला सोडवणूक करता येईल व संसार बंधनातून मुक्त होता येईल.धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम वीज वाढवावे नाम, जय जवान जय किसान, लेक वाचवा लेक शिकवा , गौहत्या करू नका, व्यसनी होऊ नका, आपल्या आई-वडिलांची सेवा करा. असे समाज प्रबोधन पर सुंदर असे हरिकीर्तन ह.भ.प. श्री.प्रशांत महाराज क्षीरसागर यांनी केले. यावेळी चौसाळा व चौसाळा परिसरातील बहुसंख्य भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.