एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना 150 रूपये प्रमाणे मिळणार रक्कम

34

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.31मार्च):-राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी शिधापत्रिक धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी २०२३ पासून अन्नधान्य ऐवजी प्रतिमा लाभार्थ्यांना १५० रुपये रोख रक्कम देण्याची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

त्यानुसार स्वस्त धान्य दुकानदारांना तात्काळ माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. स्वस्त धान्य दुकानात एपीएल (APL) केसरी शेतकरी शिधापत्रिका जोडण्यात आलेल्या असून (दि,२४/०७/२०१५) च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार शेतकरी योजनेच्या लाभासाठी RCMS वर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिका धारकांकडून DBT साठी आवश्यक असलेल्या बॅंक खात्याचा तपशील विहित नमुन्यात ऑफलाइन भरून घेण्यात यावा. शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत, बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाचा आवश्यक तपशील दर्शवणाऱ्या पानाची प्रत, बँक खाते महिला कुटुंब प्रमुखाचे घेणे बंधनकारक आहे. संबंधित शेतकरी यांचा नमुना ८ अ संकलित करावा. शिधापत्रिका धारकांकडून अर्जासोबत उचित कागदपत्राची- प्रमाणपत्राची पुर्तता करून घ्यावे तसेच संकलित केलेली माहिती तात्काळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करावी.

सदरील माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांच्याकडून पाठपुरावा सुरू असून याबाबत कोणीही हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ करू नये असे निदर्शनास आल्यास आपणाविरुद्ध नियमाधिन कार्यवाही करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे. सदरील माहिती ८ दिवसांत सादर करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले आहेत