करूणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप

46

🔸मुंडे नाव हटवण्यासाठी ५० कोटीची ऑफर; धनंजय मुंडे अडचणीत येणार?

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.31मार्च):-धनंजय मुंडे यांना निवडणुकीच्या आधी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात धनंजय मुंडे किती खरं बोलतात हरीश्रंद्राचा अवतार आहेत का? हे यावरूनच समोर येतं असा टोला करुणा शर्मा यांनी लगावला. त्याचप्रमाणे हे प्रतिज्ञापत्र म्हणजे धनंजय मुंडे किती खोटारडे आहेत याचा एक प्रकारे पुरावाच आहे असेही करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. या सह मी मुंडे नाव परत लावू नये यासाठी मला 50 कोटीची ऑफर होती असेही करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आ. धनंजय मुंडे यांनी चुकीची माहिती दिली आहे. असे जर असेल तर धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात? धनंजय मुंडे खोटारडे आहेत.

धनंजय मुंडे यांचे प्रतिज्ञापत्र दाखवत करूणा शर्मा म्हणाल्या की. धनंजय मुंडे यांनी या प्रतिज्ञापत्रात पत्नीची संख्या लपवली आहे. कायदेशीररीत्या धनंजय मुंडे दोन बायकांचे पती आहेत. ती माहिती लपवली आहे. तसेच मुलांची संख्या लपवली आहे. त्यांच्याविरोधात ज्या केसेस आहेत त्याची संख्याही धनंजय मुंडे यांनी लपवली आहे असेही करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. तसंच मुलांची संख्या ही लपवली आहे. एवढी सगळी लपवाछपवी केल्यानंतरही धनंजय मुंडे यांना ते निवडून कसे देतात? हेच मला समजत नाही असेही करूणा शर्मा म्हणाल्या.

मी आतापर्यंत गप्प होते पण आता गप्प राहणार नाही. माझ्याविरोधात त्यांनी कोर्टाचा आदेश आणला होता की मी माध्यमांना काही माहिती देऊ शकत नाही. पण आता मी शांत राहणार नाही. आज धनंजय मुंडे यांची याचिका दाखवते आहे. त्यात १९९८ पासून मी आणि करुणा सोबत आहोत असं लिहिलं आहे. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही १९९६ पासून सोबत राहतो आहोत. तसंच जे प्रतिज्ञापत्र धनंजय मुंडे यांनी सादर केलं आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की मी आणि करुणा जगातल्या काही देशांमध्ये गेलो आहे. धनंजय मुंडे आज पर्यंत जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेले आहेत तेव्हा मीच त्यांच्यासोबत होते. कारण माझ्यावर तेवढं प्रेम त्यांचं होतं. मला धनंजय मुंडेंपासून दोन मुलं आहेत. माझ्या मुलाच्या आधार कार्ड, पॅन कार्ड वर वडील म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव आहे. माझ्या आधार कार्ड वर पासपोर्टवरही धनंजय मुंडे यांचं नाव आहे. या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी हे देखील लिहून दिलं आहे की. मुलं माझी आहेत हे सगळे पुरावे करूणा शर्मा यांनी सादर केले आहे.