✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि२०जुलै):-सोमवार रोजी महाराष्ट्र सेनेच्या पक्ष कार्यालया मध्ये महाराष्ट्र सेना पक्षप्रमुख राजु भाई साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली या वेळी महाराष्ट्र सेने मध्ये आज विविध पक्ष संघटनेतील नितिन खाडे, नितिन लहाने,रवि मोरे,प्रविण बनकर,सुनिल वाहुळ,माजेद बिल्डर,शेख मुस्तफा,राहुल जाधव, दिपक रत्नपारखे, आदि कार्यकर्ते यांनी राजुभाई साबळे याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश घेतला या प्रसंगी या बैठकी मध्ये दिनांक २२ जुलै बुधवार रोजी सकाळी ११:०० वाजता औरंगाबाद शहर, जिल्हाकार्यकरणी व मराठवाडा कार्यकरणी घोषीत करण्यात येणार आहे आज रोजी पर्यंत
महाराष्ट्र सेना जनहिताच्या कामा साठी संघर्ष करत आहे या मुळे नव्याने औरंगाबाद जिल्हा संघटन बांधणी करणे गरजेचे आहे औरंगाबाद हे मराठवाडयाची राजधानी आहे औरंगाबाद असलेल्या केंद्रबिंदू ठिकानी संघटन महत्वाचे आहे लवकरच महाराष्ट्र राज्याची कार्यकारीणी सुध्दा जाहिर करणार असल्याचे राजुभाई साबळे या बैठकी दरम्यान बोलत होते.
या बैठकीला जयकिशन कांबळे,शेख मलिका बाजी,सोहेल खान,नंदकुमार अंबुरे,राजकुमार अमोलीक,सुरेश कांबळे,पंडीत हिवाळे,राजु भिगारदेव,संतोष जाधव,रवि बनसोडे,अभिजीत जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED