🔺कुरखेडा, चामोर्शी व गडचिरोली मधील 19 जण कोरोनामूक्त

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.20जुलै):-रखेडा तालुक्यातील एकावेळी कोरोना बाधित आढळून आलेल्या सर्व 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखानातून घरी सोडण्यात आले. यावेळी डॉ.संभाजी ठाकर डॉ.ओमप्रकाश डोंगे उपस्थित होते.
तसेच इतर गडचिरोली, आरमोरी चामोर्शीमधील पाच आज कोरोनामुक्त झाले. आज पून्हा एक गडचिरोली येथील विलगीकरणातील एसआरपीएफमधील एकजण कोरोना बाधित आढळला. आत्तापर्यंत एसआरपीएफ, सीआरपीएफ, बीएसएफ, पोलीस असे मिळून 210 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

तर धानोरा तालुक्यातील सोलापूरहून आलेले 4 बाधित आढळून आले. ते चौघेही गडचिरोली येथे विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

आज कोरोना बाधित – 05
आज कोरोनामूक्त- 19
जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 159
सद्या सक्रिय कोरोना बाधित- 183
मृत्यू – 01
एकुण बाधित – 343

(वरील कोरोना आकडेवारी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अशी मिळून आहे)

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, गडचिरोली, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED