स्थलांतरीत मजूरांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवा आम आदमी पार्टीची मागणी

32

✒️मूल(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मूूूल(दि.20जुुलै):-शहरात मागील दोन दिवसापासुन बाहेर राज्यातील आलेले मजुर मोठया संख्येने कोरोणा पॉझिटिव्ह आढळुन आल्यांने, शहरात भितीचे वातावरण तयार निर्माण झाले आहे. हे मजुर होम कारन्टाईन मध्ये असल्यांने, ते राईस मील मध्ये कामही करीत असल्यांने नागरीकांत असंतोष निर्माण झाला आहे. या सर्व मजुरांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे अशी मागणी आम आदमी पार्टी मुल तालुकाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचेकडे केली आहे.
यापुर्वी मुल शहर हे सेफ होते, मात्र मागील दोन दिवसापासुन बाहेर राज्यातुन राईस मील मध्ये रोजगारासाठी आलेले मजुर पॉझिटिव निघाले. याकडे आम आदमी पार्टीने उपविभागीय अधिकारी यांचे लक्ष वेधले. संस्थात्मक विलगीकरण कक्षातील सुविधाबाबत नागरीकांत चुकिची माहिती पसरत असल्यांने, नागरीकांत संस्थात्मक विलगीकरणाबाबत नकारात्मक भावना निर्माण होवुन होम कारन्टाईनची मागणी होत असते, त्यामुळे प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणातील सुविधाबाबत नागरीकांच्या शंका दुर करावी अशीही मागणी करण्यात आली.
दिल्ली राज्यात संस्थात्मक विलगीकरणात देण्यात येणार्रया सुविधाबाबत तेथील सरकारने प्रचार व प्रसार केल्यांने, तेथील नागरीक स्वत:हुन संस्थात्मक विलगीकरण कक्षात जातात, त्यामुळे, दिल्लीतील कोरोणा आटोक्यात येत आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले. संस्थात्मक विलगीकरण करण्यात जागा अपुरी पडत असल्यास, महाबिज केंद्राचा वापर करण्याबाबत प्रशासनाने विचार करावा अशी सुचनाही आपने निवेदनातुन केली आहे.
उपविभागीय अधिकारी महादेव खेळकर यांनी निवेदन स्विकारून, सुचनांचे स्वागत करीत, प्रशासन सतर्कतेने काम करेल, नागरीकांनी भिती बाळगु नये. प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन केले.
निवेदन आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिध्दावार यांचे नेतृत्वात, आपचे जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शामकुळे, अमित राउत, सचिन वाळके, प्रकाश चलाख आदि कार्यकर्ते उपस्थित होते.