पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.9एप्रिल):-धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने ७ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत पुसद येथील जुन्या पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२३च्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे उद्घाटन दि. ७ एप्रिल शुक्रवार रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होईल .अध्यक्षस्थानी आमदार इंद्रनिल नाईक हे राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी एस .कार्तिकेयन, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर, दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुडचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, पाटबंधारे विभाग पुसद उपविभागीय अभियंता अविनाश भगत, बाळासाहेब पाटील कामारकर, महेश खडसे, तहसीलदार एकनाथ काळबांडे, मुख्याधिकारी नगरपालिका पुसद किरण सुकलवाड, सहाय्यक निबंध सुनील भालेराव ,भीमराव कांबळे, विठ्ठल खडसे ,अर्जुन लोखंडे, डॉ.राजेश वाढवे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या धम्मक्रांती प्रज्ञापर्वात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.८ एप्रिल शनिवार रोजी देशातील गाजलेले भिमशाहिर संभाजी भगत व संच मुंबई यांच्या आंबेडकरी जलसाचा कार्यक्रम होईल.दि.९ एप्रिल रविवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक योगदान या विषयावर प्रमुख वक्त्या पिंकी शेख व आंबेडकरी साहित्यिक ज्योती खंदारे मार्गदर्शन करतील.दि.१० एप्रिल सोमवार रोजी भारत देशाच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर प्रमुख वक्ते प्रवीण देशमुख यांचे मार्गदर्शन व साहित्यिक प्रा .माधव सरकुंडे यांचे मार्गदर्शन होईल.दि.११ एप्रिल मंगळवार रोजी आंबेडकरी चळवळीतील युवकांची भुमिका या विषयावर दंगलकार नितीन चंदनशिवे व प्रा. सय्यद सलमान यांचे मार्गदर्शन होईल.दि.१२ एप्रिल बुधवार रोजी अनिरुद्ध वनकर यांचा भीम गीत गायनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल.दि.१३ एप्रिल गुरुवार रोजी महाडचा मुक्ती संग्राम भारतीय नागरिकांचे संविधानिक हक्क या विषयावर उच्च न्यायालय मुंबईचे माजी न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांचे मार्गदर्शन होणार आहे.दि १४ एप्रिल रोजी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी ७:३० वाजता पंचशील ध्वजारोहण, सामूहिक बुद्ध वंदना व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाला माल्यार्पण करण्यात येईल. व समता सैनिक दलांची भव्य मानवंदना होईल. सकाळी ९ वाजता भव्य मोटरसायकल रॅली व दुपारी ४ वाजता भव्य अभिवादन रॅली निघेल. रात्री १० वाजता समारोपाला बुद्ध वंदना घेण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेला धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२३चे अध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष एन.आर.वाहुळे, सचिव अंबादास वानखेडे,उपाध्यक्ष नारायण ठोके ,नितेश खंदारे संतोष गायकवाड,सहसचिव विष्णू सरकटे प्रफुल भालेराव कोषाध्यक्ष पी .आर. खंदारे ,सहकोषाध्यक्ष प्रीतम आळणे, राजू पठाडे, संघटक समाधान केवटे ,जगदीश सावळे, सहसंघटक मुन्ना हाटे, संजय वाढवे, कार्यालयीन सचिव प्रा. डॉ.सुनील खाडे तसेच इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष किशोर कांबळे यांनी तसेच सहकारी यांनी केले आहे. संचलन कोषाध्यक्ष परमेश्वर खंदारे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष एन.आर.वाहुळे यांनी मानले.