चिंचरगव्हाण येथे पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला व महानुभाव पंथीय भव्य मेळाव्याचे आयोजन !

33

🔸विविध राज्यातील हजारो महानुभाव भक्तांची राहणार उपस्थिती !

🔹१४ ते १८ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन ; हजारो भक्त घेणार संत महंतांचे दर्शन !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.9एप्रिल):-चिंचरगव्हाण येथे अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या प्रेरणेने वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ द्वारा आयोजित पंचकृष्ण समाज प्रबोधन व महानुभाव पंथीय भव्य मेळाव्याचे आयोजन १४ एप्रिल ते १८ एप्रिल २०२३ दरम्यान पाच दिवसीय भव्य विविध कार्यक्रमाचे आयोजन चिंचरगव्हाण येथे करण्यात आले आहे .

या भव्य मेळाव्यामध्ये महानुभाव पंथातील थोर संत महंतांचे व विद्वान अभ्यासकांचे मार्गदर्शन केल्या जाणार असून, या पाच दिवसामध्ये अनेक विविध कार्यक्रमाद्वारे अहिंसा , परमोधर्म , राष्ट्रीय एकात्मता , स्त्री समता ,विषमता , व्यसनमुक्ती , धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम , अनन्यभक्ति , विविध मूल्यांचा समाज कल्याणकारी संदेश तळागळातल्या सामान्य जनतेपर्यंत पोहचवून जनलोकात स्नेहभाव व परमप्रीती निर्माण करणाऱ्या मंगलमय भव्य सोहळ्यास महानुभाव पंथाच्या थोर संत महंतांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेण्याकरिता विविध राज्यातील हजारो भक्तांचा जनसमुदाय चिंचरगव्हान येथे उसळनार आहे.

या भव्य मेळाव्यामध्ये पाचही दिवस नामस्मरण , मंगलप्रभात, योगासने, दंडवत, सामुदायिक पारायण, व्याख्यान सत्र, देवपूजा, प्रसाद वंदन, अशाप्रकारचे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेचे ध्वजारोहन, उदघाटन सोहळा १४ एप्रिल रोजी कवीश्वर कुलभूषण प पु प म श्री आचार्यप्रवर नगराजबाबा शास्त्री, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून प्रमुख व्याख्याते म्हणून प पु प म श्री आचार्यप्रवर मधोव्यासबाबा शास्त्री यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या मेळाव्यामध्ये प पु प म श्री आचार्यप्रवर दर्यापूरकर बाबा, प पू त मीराताई मनेकर, प पू त उज्वालाताई तळेगावकर, कृष्णकथाव्यास प पु प म श्री मानसशास्त्री महानुभाव, प पु प म श्री आचार्यप्रवर राजधरबाबा वायंदेशकर, प पु प म श्री सारंगधरबाबा पंजाबी, प पु प म श्री विनयमुनी उपाख्य वैरागीबाबा पंजाबी, कवीश्वर कुलाचार्य प पु प म श्री आचार्यप्रवर करंजेकरबाबा यांच्यासह विविध मान्यवरांचे समाज प्रबोधन व्याख्यान कार्यक्रम हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला व महानुभाव पंथीय भव्य मेळावा दि. १४, ते १८ एप्रिल पर्यंत आयोजीत करण्यात आलेला आहे. पंथातील थोर संत महंताचे व विद्वान अभ्यासकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये अनेक विविध कार्यक्रमाव्दारे अहिंसा, परमोधर्म, राष्ट्रीय एकात्मता, स्त्री समानता, विषमता, व्यसनमुक्ती अनन्यभक्ती या विविध मूल्यांचा समाजकल्याणकारी संदेश तळागाळातल्या सामान्य जनतेपर्यंत पोहचवून जनलोकात सस्नेहभाव व परमप्रीती निर्माण करणाऱ्या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहून शुभ अवसराचा व संत दर्शनाचा लाभ घ्यावा. — श्री वैरागीबाबा पंजाबी अध्यक्ष ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ अमरावती जिल्हा.