मुस्लिम बालकाला जीवन जगण्यासाठी मदत करून भाजपचा स्थापना दिन साजरा

32

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.10एप्रिल):-येथील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सिकलसेल ग्रस्त शेख रहमान नामक बालकास त्याचे जीवन वाचविण्यासाठी आवश्यक ते रक्तदान व आर्थिक मदत करून स्थापना दिन साजरा केला. भाजप हिंदू प्रेमी असले तरी मुस्लिम विरोधी नाही असा प्रत्यय या उपक्रमातून आपल्या कृतीतून दाखवून दिल्याने सर्वत्र या जातीभेदणाऱ्या उपक्रमाची चर्चा चालली आहे. विविध उपक्रम राबवून संपूर्ण देशामध्ये भाजपचा स्थापना दिन साजरा झाला. आमदार निलय नाईक यांच्या मागदर्शनात पुसद शहर भाजपा तर्फे नेहमीच चांगले उपक्रम राबविल्या जात असतात. पवित्र रमजान महिना आणि त्यात ज्या मुस्लीम सिकलसेल बालकाचे जीवन रक्तावरच चालते.

त्या बालकास रक्तदाते दिपक सोनी यांनी रक्तदान केले व रक्तबॉटलसाठी लागणारे आर्थिक मदत भारतीय जनता पक्षाचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष निखील चिद्दरवार, शहर अध्यक्ष दीपक परिहार, शहर सरचिटणीस राजु जगताप, श्रीरामनवमी जन्मोत्सव समिती चे अध्यक्ष विश्वजीत सरनाईक, भाजप चे जेष्ठ पदाधिकारी बाळासाहेब उखळकर, राहूल देशमुख, संतोष आर्य यांनी मदत देऊन आदर्श उपक्रम राबविला. दरमहिण्याला रक्त चढवावे लागते. मजुरी करीत असल्याने खर्च झेपावत नाही. रक्त व पैसे देउन मदत केल्याने मुलाचा जीव वाचविण्यासाठी मदत झाली असे म्हणुन भाजप पदाधिकारी यांचे शेख रहमान चे वडिलांनी आभार मानले.