गोंडपीपरी तालुक्यातील शिवणी देशपांडे येथील एका शेतकऱ्याचा मोटार पंपाच्या करंट ने जागीच मृत्यू

13

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)
मो:-8766910610

गोंडपिपरी(दि.20जुलै):- तालुक्यातील शिवणी देशपांडे येथील एका शेतकऱ्याचा मोटार पंपाच्या करंट ने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव कुशाबराव ताजने असे आहे.
शिवणी देशपांडे हा छोटासा गाव तेलंगणा सीमेवर नदीच्या काठी बसलेले आहे. सध्या पाण्याची कमतरता असल्यामुळे रोहनी साठी तेथील शेतकऱ्यांना नदीच्या पाण्याचा आसरा घ्यावा लागतो. आज दिनांक 20 जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान कुशाबराव ताजने हे आपली मोटार पंप चालत नसल्यामुळे बघण्याकरिता मोटार पंपा जवळ पाण्यात उतरले. मात्र मोटार पंप चे कनेक्शन चालूच असल्यामुळे जसे त्याने मोटार पंपाला हात लावताच संपूर्ण शरीरात करंट लागला. पाण्यात असल्यामुळे विजेचा शॉक कुशाबराव ला जोरदार लागला व जागीच मृत्यू झाला. ही बातमी शिवणी देशपांडे गावात कळताच गावकऱ्यांनी गोंडपिपरी पोलिस स्टेशन ला फोन करून सांगितले. गोंडपिपरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार संदीप धोबे साहेब यांना कळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचले. कुशाबराव ताजने यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. ही माहिती कळताच गावात हळहळ व्यक्त होत असून, त्याच्या घरी घरचा प्रमुख व्यक्ती हरवल्याचा दुःखाचे सावट पसरले आहे. हा अपघात दुर्दैवी असून गोपीनाथ मुंडे अपघात विमा प्रस्ताव बनविण्यासाठी कृषी सहाय्यक यांना कळविण्यात आले आहे.