वीज बिल माफ करावे मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करणार-सय्यद रफत हुसैन

    46

    ✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)

    मो:-9763127223

    नंदुरबार(20जुलै):- सोमवार रोजी एम आई एम पक्ष अध्यक्ष मा. बैरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहब यांचा आदेश अनुसार,एम आई एम पक्ष महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद इम्तियाज़ जलील साहब यांचा अध्यक्षता व महाराष्ट्र कार्य अध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी साहब यांचे नेतृत्व खाली नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सय्यद रफत हुसैन साहब यांनी मा.जिल्हा अधिकारी साहब यांचे मार्फत 5 महिन्याचा लाइट बिल माफ करण्यात यावे अशी मांगनी महाराष्ट्र सरकार यांना निवेदना द्वारे करण्यात आली आहे. मांगनी पूर्ण ना झाल्यास एम आय एम पक्ष तर्फे आंदोलन करणार अशा सुद्धा म्हणाले आहेत. व आज रात्री 8 वाजता आप आपली घराची लाइट बंद करुण निषेद नोंदवावे अशी विनंती नागरिकांशी करण्यात आली.

    यावेळी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सय्यद रफत हुसैन साहब, युवा जिल्हा अध्यक्ष शोएब खाटीक साहब, युवा जिल्हा कार्याध्यक्ष मुज़म्मिल हुसैन साहब, प्रमुख सदस्य हाजी सय्यद सैफ अली, व अशफाक भाई आदि उपस्थित.