५ एसआरपीएफ जवानांसह स्थानिक २ कोरोना बाधित, तर ५ जण आणखी कोरोनामुक्त

    46

    स. १०.००वा

    ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    गडचिरोली(दि.21जुलै) : काल रात्री गडचिरोली येथील ३, वडसा येथील २ एसआरपीएफ जवान कोरोना बाधित आढळून आले. तर गडचिरोली नवेगाव येथील महिला नांदेड वरून परतलेली कोरोना बाधित आढळून आली. तसेच गुरवाळा येथील जिल्ह्याबाहेरुन आलेला एकजण गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात होता त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले. तसेच गडचिरोली येथील कोरोना कोवीड सेंटर येथील ५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना काल रात्री दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली. रात्री नव्याने आढळलेल्या ७ नवीन बाधितांमूळे सक्रिय रूग्णांची संख्या १८५ झाली. तर एकूण रूग्णांची संख्या ३५० झाली. आत्तापर्यंत १६४ रूग्ण बरे झाले तर १ मृत्यू आहे.