चिमुरात अवैध दारू विक्रेत्यांनी घेतली पोलीस कारवाही धास्ती

26

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.21जुलै):-चिमुर पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धाडी टाकण्याचे अभियान जोरात चालविले असून यांच अभियानाअंतर्गत काल (दि.20जुलै)रोजी 3 लाख 32 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीस अटक केली तर फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध चिमुर पोलीस घेत आहेत.

चिमूर पोलिसांनी लागोपाठ चालवलेल्या अवैद्य दारू विक्रेते कारवाही मूळे चिमूर परिसरात शांतता असतानाच कायद्याला न जुमानता काही दारू विक्रेते लपून छपून दारू विक्री करीता नवीन नवीन व्यक्ती मार्फत दारू विक्री करीत असतात. अशातच माहिती मिळाली की वारंवार केसेस असलेला अवैद्य दारू विक्रेता कृष्णा नारनवरे हा हेमंत केशव केलझरकर यास देशी व मोहदारू विक्रीकरिता देण्यासाठी स्वतःचे चारचाकी गाडीने येत आहे, या माहितीवरून त्यांचेवर पाळत ठेऊन असताना कृष्णा नारनवरे याने हेमंत केलझरकर यास देशी दारू विक्रीकरिता देत असताना पोलिसांनी धाड टाकली आरोपी गाडी सोडून फरार झाले तेव्हा जागेवर देशी दारू, मोहा दारू, व फोर्ड फिएसता क्र MH 02 AY 9424 असा एकूण 3,32,800 रु चा मुद्देमाल मिळून आला. आरोपी हेमंत केशव केलझरकर वय 45 वर्ष रा चिमूर यास अटक करण्यात आली असून आरोपी कृष्णा नारनवरे रा चिमूर याचा शोध घेणे सुरू आहे.
सदरची कारवाही उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे ,  यांचे मार्गदर्शनात पो.हवा. विलास निमगडे , ना.पो.शी. किशोर बोढे, पो.शी.सचिन खामनकर, सचिन गजभिये यांनी पार पाडली.