पुसद येथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त परिसंवाद व कृतज्ञता सोहळा

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.11मे):-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजन नायक श्रद्धेय माजी खासदार ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी पुसद शहर व तालुका आयोजित ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर लिखित

” समकालीन राजकारण आंबेडकरवादी आकलन “

या पुस्तकावर आधारित परिसंवाद व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडी यवतमाळ पश्चिम चे जिल्हा प्रभारी मा. मोहन राठोड ,प्रमुख वक्ते बालाजी थोटवे नांदेड ,कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. के.दामोधर जिल्हा महासचिव यवतमाळ प., तर मंचावर उपस्थित एस के राठोड जिल्हा उपाध्यक्ष ,सप्त खंजिरी वादक पंकज पाल महाराज, पुज्य भंते सारीपुत्त ,मौलाना सय्यद हुसेन जिल्हा संघटक, मौलाना मुफ्ती अब्बास, मौलाना मोहम्मद सोहेल, बिपिनभाऊ चीद्दरवार (ज्ञानेश्वर मंदिर पुसद )गणेश महाराज धर्माळे, ॲड.रहुफ शेख, गजानन देशमुख (माणुसकीची भिंत )नवेद मिर्झा जमाते इस्लामी हिंद , वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष बुद्ध रत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे हे उपस्थित होते या कार्यक्रमात पुसद शहरांमध्ये रमजान ईद ,शिवजयंती ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, दुर्गा उत्सव मंडळ, गणेश मंडळ, अनेक सामाजिक धार्मिक संस्थाने, सामाजिक मंडळ ,महिला मंडळ, समाजसेवी संस्था इत्यादींचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी मौलाना सय्यद हुसेन, मौलाना मोहम्मद सोहेल, सप्तखंजिरी वादक पंकज पाल महाराज ,गणेश महाराज धर्माळे , ॲड.रहुफ शेख ,माननीय मोहन राठोड यांनी सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विचार मांडले अध्यक्षीय समारोप समारोप जिल्हा महासचिव डी.के दामोधर यांनी केला कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी कार्यक्रमाच्या आयोजना बाबतची भूमिका प्रास्ताविकातून विशद केली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अंबादास वानखेडे यांनी व आभार प्रदर्शन जयानंद उबाळे यांनी केले.

कार्यक्रमास शहरातील विविध जाती समूहातील असंख्य महिला पुरुष व युवक वर्ग विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी विविध माध्यमांचे पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शहर व तालुका, तसेच महिला आघाडी पुसद यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.