सुशिक्षित बेरोजगारांना आधार क्रमांकाची माहिती भरण्याचे आवाहन

52

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदूरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223

नंदुरबार (दि.21जुलै) :- ऑनलाइन नाव नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी तात्काळ आधार क्रमांक प्रोफाईलमध्ये नमूद करून प्रोफाईल अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील उमेदवारांची नाव नोंदणी 2013 पासून https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सुरू आहे.
उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर त्यांना यूजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने संकेतस्थळावर उपलब्ध सुविधा आणि माहितीचा लाभ घेता येतो.
उमेदवारांनी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक संकेतस्थळावर आपल्या प्रोफाईलमध्ये भरावा. प्रोफाईल अद्ययावत न केल्यास नाव नोंदणी 31 ऑगस्ट 2020 अखेर रद्द होईल. अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड,तळ मजला रुम नं.27, नंदुरबार येथे (दूरध्वनी क्रमांक 02564- 210026) संपर्क साधावा.