व्हाँईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकाराच्या विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी पुसद यांना दिले निवेदन

28

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.11मे):-माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितले जाते. मात्र माध्यमाचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. याकडे लक्ष वेधण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.पुसद यांना पत्रकाराच्या विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत पाच वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण ‘क’ वर्ग दैनिके (लघू दैनिक) यांना मारक आहे. लघू दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात, आदी मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनावर व्हॉइस ऑफ मीडियाचे पुसद तालुकाध्यक्ष समाधान केवटे, उपाध्यक्ष दिनेश खांडेकर ,मंगेश पारटकर, कार्याध्यक्ष मदन बडगुजर, कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, कार्यवाहक यशवंत जाधव, सरचिटणीस शंकर माहुरे, सहसचिटणीस प्राध्यापक अंबादास वानखेडे, संघटक रवी खरात, प्रसिद्धीप्रमुख अरुण बरडे, सदस्य अरविंद कांबळे, अविनाश आखरे, पुरुषोत्तम सोडगीर, गुलाब वाहुळे ,विजय चव्हाण,नंदकिशोर बंग,रविकांत शिंगनकर ,ज्ञानेश्वर मेटकर,विजय निखाते,उपस्थित होते