वाळू साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन नागरिकांनी करू नयेत

35

🔹मा.तहसीलदार रणजितसिंह कोळेकर

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13मे):-वाळू करिता नवीन नियमाप्रमाणे विक्री खरेदीसाठी शासनाकडून कोणत्याही पूर्वसूचना आम्हाला आलेले नाहीत व नवीन धोरणानुसार सहाशे रुपये ब्रास चा विचार असेल त्यामुळे गंगाखेड तहसील करिता नवीन डेपो करिता विचार विमर्श सुरू आहे. मा.जिल्हाधिकारी कार्यालय परभणीच्या वतीने वाळू विषयी कोणतीही पूर्व सूचना/निविदा आम्हाला कळविण्यात आलेल्या नाहीत

त्यामुळे गंगाखेड परिसरातील नागरिकांनी वाळू खरेदी करिता ऑनलाइन अर्ज करू नयेत.ऑनलाइन वाळू करिता अर्ज भरण्याकरिता जनसामान्यांची आर्थिक फसवणूक होऊ शकते त्याकरिता आम्ही सुद्धा नोटीस बोर्डवर सूचना पत्र माहितीस्तव लावणार आहोत त्यामुळे वाळू खरेदी करिता ऑनलाईन अर्ज नागरिकांनी सध्या परिस्थितीला करू नयेत असे आवाहन गंगाखेड तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.