मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात २८ रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न !

30

🔸हर्निया, हायड्रोसील, गर्भपिशवी, अमबिलिकल हर्निया यासह इतर रुग्णांना मिळाला दिलासा !

🔹जागतिक मातृ दीना निमित्य मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.14मे):- येथील उपजिल्हा रूग्णालयात जागतिक मातृ दिनाचे औचित्य साधुन विविध समाजीक उपक्रम राबवून मातृ दिवस साजरा करण्याचे समाधान मिळणार आहे. मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात १४ मे रोजी तब्बल २८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून हा अभिनव उपक्रम राबविला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांनी दिली.

महात्मा ज्योतिरव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे २८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून शिबीर संपन्न झाले.शिबिराचे उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे आयोजित शिबिरात तब्बल २८ सामान्य शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.

या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार, सर्जन डॉ प्रविण बिजवे, डॉ राहुल खन्ना, व भुलतज्ञ डॉ. जगदीश काळभोर, उपस्थीत होते. भव्य शस्त्रक्रिया शिबिर जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौदंळे, डॉ संदीप हेडाऊ, डॉ प्रशांत घोडाम, डॉ रणमले, डॉ सुमेध चत्से, डाॅ भिसे, सुशिल तिवारी यांचे मार्गदर्शना खाली पार पडले तसेच उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील, डॉ सचिन कोरडे, मीनाक्षी वागारे, रूथ लोखंडे, वर्षा दरोकर श्रीमती मनावर, स्वाती पाटील, अर्चना वानखडे, सुजित वानखडे, रेश्मा बहुरूपी, वैष्णवी जोशी, प्रवीण कापडे आकाश जवंजाळ, बबिता तांबे, शिल्पा राऊत, विद्या वानखडे, कमला तायवाडे, सागर झटाले महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना वरुड व मोर्शी येथील वैद्यकीय समन्वयक डॉ घनश्याम मानकर, वशीम शेख, प्रकाश पांडे, सुजाता पांडे, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी शिबिराच्या यशस्वीतेकरीता यांनी अथक परीश्रम घेतले. शिबिराचे समारोप रुग्णांच्या वैयक्तिक भेटी घेऊन व सविस्तरपणे माहिती व मार्गदर्शन करून करण्यात आली.

प्रतिक्रिया — १)
मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळत असून हार्निया गर्भपिशवी शस्त्रक्रिया, शरीरावरील ट्युमर, स्तनांच्या गाठी, पोटाच्या शस्त्रक्रिया, मुळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्या जात आहेत. रुग्णांनीही वरील आजारांबाबत आपली तपासणी करून उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ घ्यावा — डॉ. प्रमोद पोतदार वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मोर्शी.

२)
गेल्या काही वर्षांपासून थांबलेल्या मोर्शी उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियांचा ओघ आता पुन्हा एकदा सुरु झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार हे रुजू झाल्यापासून त्यांनी विविध प्रकारच्या शेकडो शस्त्रक्रिया केल्या आहेत. अर्थातच खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपये खर्च असणाऱ्या शस्त्रक्रिया आता मोर्शी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत होऊ लागल्याने सर्वसामान्य, गोरगरिब रुग्णांसाठी ही दिलासाजनक बाब आहे — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.