अजून किती लोकांचे बळी गेल्यावर सरकारला जाग येणार? – महेंद्र ब्राम्हणवाडे

140

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.15मे):-सुरजागड प्रकल्प सुरू झाल्यापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक वाढलेली आहे त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहेच सोबतच सुरजगड मध्ये चालणाऱ्या अनेक ट्रकचालकांचे चालक रस्ते वाहतुकीचे नियम बाजूला टांगून सुसाट वेगाने गाड्या चालवतात त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत. अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे. मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सरकार कोणत्याही प्रकारचे पाऊल उचललेले दिसत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधीवर काही दबाव आहे की काय ? अजून किती लोकांचे बळी गेल्यावर सरकारला जाग येणार असा प्रश्नचिन्ह गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्याची दुरावस्था सुरजागड मध्ये चालणाऱ्या जड वाहतुकीमुळे झालेली आहे त्यामुळे रस्त्याची सहा महिन्याच्या आत दुरुस्ती करण्यात यावी म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आष्टी येथे चक्काजाम आंदोलन केले होते. हा सहा महिन्याचा कालावधी संपुष्टात येत असताना अद्यापही हव्या त्या प्रमाणात आष्टी ते सिरोंचा महामार्गाचे काम झाल्याचे दिसत नाही. कोणसरी प्रकल्पाचेही काम संत गतीने सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्पातील माल बाहेर जिल्ह्यात आणि राज्यात विकल्या जात आहे. त्याचा जिल्ह्यातील नागरिकांना कुठलाही फायदा होत नाही मात्र त्याचे नुकसान जिल्ह्यातील नागरिकांना भोगावे लागत असून जिल्ह्यातील अनेक युवकांना रोजगारांपासून वंचित राहावे लागत आहे.

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक नागरिकांचा जीवही गेलेला आहे, सुरजागड प्रकल्प सुरु झाल्या पासून महिलांवर, आदिवासी बांधवांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचा रात वाढ झालेली आहे. खदानी परिसरातील गाळ आणि धुळीमुळे शेतीचे, पर्यावरणाचे व वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सुरजागड – कोनसरी प्रकल्पाततील लोकांवर दबाव तंत्र वापरून बळजबरीने त्यांच्या जमिनी बडकवल्या जात आहे. इतक्या सगळ्या जिल्ह्यात समस्या असून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एक दिवसाच्या सहलीला आल्यासारखे वर्षातून दोनदा जिल्हा दौऱ्यावर येतात आणि निघून जातात. राजाचे मुख्यमंत्री हे सुद्धा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असून त्यांचे सुद्धा जिल्ह्यातील समस्यांकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष नाही.

आता तरी सरकारने तातडीने जिल्ह्यातील समस्यांकडे लक्ष घालून कोणसरी प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावे. अवघ्या एक दीड महिन्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होनार आहे त्यामुळे जर आता रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर परत नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे म्हणून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. सुरजागड मध्ये चालणाऱ्या ट्रकांकडून झालेल्या अपघातांची सखोल चौकशी करून लायड मेटल कंपनीवर 302 चे गुन्हे दाखल करून कंपनीच्या मनमानी कारभारावर आडा बसवावा अन्यथा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.