मुख्य रस्त्याचे काम कासवगतीने सुरु !

33

🔸खोदलेले रस्ते पावसापूर्वी पूर्ववत करा :नरसिंग हामने उपसरपंच यांची मागणी

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.19मे):- तालुक्यात शासनातर्फे मंजूर विविध रस्तेविकास प्रकल्पातून कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर असली, तरी गडचांदुर ते पाटण-शेणगाव- जिवती ते तेलंगणा सीमेपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रिटीकरणं करण्याचे काम कंत्राटदाराकडून ऐन पावसाच्या तोंडावर या रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस अतिशय दयनीय झाला आहे. हा रस्ता सध्या तरी पावसापूर्वी पूर्ववत होईल असे चित्र दिसत नाही, परंतु प्रत्यक्षात आता पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण व्हावे म्हणून कंत्राटदरकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम केले जात आहे.

या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे, खड्ड्यांमुळे, कुणाला इजा झाल्यावर, अपंगत्व आल्यावर अथवा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार असेल तर मग कोट्यवधी रुपये मंजूर होऊन उपयोग काय, असा साहजिक प्रश्‍न सर्वसामान्य तालुका वासीयांना पडला आहे.

नाईकनगर,पाटण,आंबेझरी ,शेणगाव,तालुक्याचे ठिकाण येथे सुरू असलेल्या मुख्य रस्त्याचे व त्या लगत नाल्यांची कामे होत आहेत,गिट्टी आतरुन आहे त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहन चालकांची कसरत सुरू आहे. तर हा अपघाताला निमंत्रण देणारा रस्ता झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून व त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. आता पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार ? असा प्रश्न नागरिकांतून व लोकप्रतिनीधीतून होत आहे.

परिणामी आजूबाजूच्या बहुतांश गावातील नागरिकांना तालुक्याच्या किंवा गडचांदुरच्या ठिकाणी येण्यासाठी महत्वाचा हा रस्ता आहे. सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झालेल्या या रस्त्यावरून खड्डे चुकविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत असून वाहन चालक त्रस्त झाले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघाताला निमंत्रण मिळत असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर दुचाकी, तीन व चार चाकी वाहने या खड्ड्यात आदळत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नियमितपणे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मणक्याचे आजार जडू लागले आहेत. मात्र मे महिना ही आता अर्धा संपत आला असून जून महिन्यात पावसाळा सुरू होत आहे. तरी रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांनी व लोकप्रतिनीधीने उपस्थित केला आहे.

◆ वाहनचालकांना काम पूर्ण होण्याची वाट पाहवी लागणार आहे
या रस्त्यावरून सीमावर्ती व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी ये – जा करावी लागते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी आहे. मात्र रस्त्याचे काम काही वर्षांपासून सुरू आहे परिणामी, रस्त्यावर खड्डे पडलेले व कंत्राटदरकडून काम सुरू असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तर प्रत्येक वर्षी संबधित बांधकाम विभागाकडून काम तत्काळ पूर्ण होईल असे सांगण्यात येते, मात्र पावसाळा तोंडावर आल्यामुळे काम तात्काळ होईल असे वाटत नाही. त्यामुळे पुन्हा नागरिकांना आणि वाहन चालकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
– नरसिंग हामने उपसरपंच ग्रामपंचायत शेणगाव