अखेर आमदार बच्चू कडू यांना मिळाला मंत्रिपदाचा दर्जा!

41

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.24मे):-आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे. बच्चू कडू यांना आता मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान एकाच दिवशी राबवण्यात येणार आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष पद आणि प्रमुख मार्गदर्शक हे ही पद आमदार बच्चू कडू यांना दिलं जात आहे.

बच्चू कडू यांची नाराजी वारंवार दिसून येते. मंत्रिपद कधी मिळणार यावरूनही नाराजी व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे आभियान एकाच दिवशी राज्यभर राबवले जाणार आहे. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद हे बच्चू कडू यांना दिलं आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड करुन त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. शासनाने यासंबधीचे परिपत्रक काढून बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर केला आहे. गेल्या वीस वर्षांपासून दिव्यांगांसाठी बच्चू कडू लढा लढत आहे. एक प्रकारे त्यांची नाराजी घालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागल्या आहेत.