गेवराईत खाजगी सावकाराची दादागिरी बेतली युवकाच्या जीवावर

28

🔺महिला सावकारांच्या जाचास कंटाळून युवकांने घेतले विष; प्रकृती चिंताजनक

✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.30मे):-सावकारीला चाप बसावा यासाठी सावकारी कायदा आणला आहे. मात्र, त्यानंतरही खाजगी सावकरीचा जाच कमी होताना दिसत नाही.अशीच एक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. खाजगी महिला सावकारांच्या जाचास कंटाळून एका युवकांने विष घेतल्याची धक्कादायक घटना गेवराई शहरातील तय्यब नगर भागातील उघडकीस आली. पीडित युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर बीडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेख आसेफ नियाजोद्दीन (वय 30 वर्ष) असे विष घेतलेल्या युवकाचे नाव आहे. तय्यब नगर भागातील रहीवासी असलेल्या एका महिला सावकाराकडून शेख आसेफ नियाजोद्दीन याने पैसे घेतले होते. ते पैसे उसतोडणीवरुन आल्यानंतर परत करतो, असे या युवकाने सांगितले. परंतु, सावकार व तीच्या पतीने जबरदस्ती मारहाण करुन उपजिविका भागवण्याचा ट्रॅक्टर ताब्यात घेतला व चार लाख रूपये आणून दे असे सांगितले.

यानंतर या युवकाने टोकाचे पाऊल उचलत विषारी द्रव्य घेतले. घटनेनंतर त्याला तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयातून प्राथमिक उपचार करुन बीड येथे हलवण्यात आले. तसेच या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. याबाबत या युवकाने सावकारांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

यामुळे खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यात खाजगी सावकारी शेतकऱ्यासह तरुणांचा जीवावर उठली असल्याचं दिसून येत आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.