चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट बंधनकारक

32

🔹मोटारवाहन कायद्याची कडक अंमलबजावणी होणार

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चंद्रपूर(दि.2जून):- जिल्ह्यात होणाऱ्या अपघातात मोटार सायकलस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने जिल्ह्यात दुचाकी मोटारसायकल चालक व त्यांचे मागे बसणाऱ्या चार वर्षावरील सर्व व्यक्तींना मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोटारवाहन कायद्यातील नियमांची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शासकीय आस्थापना व खाजगी संस्थेतील अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी या बाबीची दखल घ्यावी.वाहनधारकाने नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांविरूद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्यांच्याकडून एक हजार रुपये दंड तसेच वाहन धारकाची अनुज्ञप्ती 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.