वसंतराव नाईक गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

32

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.2जून):-हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री कै.मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रत्यर्थ दरवर्षी 18 ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकऱ्यांचा तसेच कृषी शास्त्रज्ञाचा शाल, श्रीफळ ,स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याची पुसदच्या वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानची सुदीर्घ अशी परंपरा आहे.

1) विदर्भ ,मराठवाडा ,प. महाराष्ट्र, खानदेश व कोकण अशा विभागातून विभाग निहाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन आणि अधिक नका प्राप्त केला असल्यास आपला जीवनलेख (बायोडाटा) पाठवावा त्यामध्ये खर्च किती, उत्पादन (टनामध्ये )किती व बाजारपेठेत विक्री केल्यानंतर किती निव्वळ नफा झाला याची सविस्तर माहिती द्यावी.

2) यावर्षी शास्त्रज्ञकरिता *औषधी व सुगंधी वनस्पतीवर विशेष कार्य करण्याबद्दल* हा विषय निवडला आहे. ज्यांनी औषधी व सुगंधी वनस्पतीवर विशेष संशोधनात्मक कार्य केलेले आहे. अशा शास्त्रज्ञांनी त्यांचा जीवनलेख (बायोडाटा) आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा

3) *शेतकऱ्यांनी कृषीविषयक आणि कृषी सलंग्नित क्षेत्रामध्ये केलेल्या विशेष कार्याबद्दल पुरस्कार* वरील विषयावर कार्य करणाऱ्या शेतकरी, उत्पादक कंपनी, सामूहिक शेती यांनी देखील सविस्तर माहितीसह प्रस्ताव पाठवावा वरील सर्वांनी आपले प्रस्ताव दोन पासपोर्ट फोटोसह दिनांक 10 जुलै 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठविण्याचे आव्हान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे .

पत्रव्यवहाराचा पत्ता कृषीभूषण दीपक आसेगावकर अध्यक्ष वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद श्रीमती वसल्याबाई नाईक महिला महाविद्यालयासमोर पुसद- 445204 जि.यवतमाळ

🔸दिपक आसेगावकर:- 9922552222,

🔹प्रा.गोविंद फुके:- 9822466902,

🔸प्रा.अप्पाराव चिरडे:-9404236236,

🔹उत्तमराव जाधव:-7588043036

🔺ई-मेल:-vppusad@gmail.com