✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि 22जुलै):- तालुक्यातील भं. तळोधी लगत असलेल्या धामणगाव येथे दुपारी सुमारे 3.30 च्या दरम्यान शेतात वीज पडल्याने तिथे चरत असलेल्या शेळ्या पैकी तीन शेळ्या मरण पावल्याची घटना घडली आहे. धामणगाव येथील शेतकरी उमाजी कुकुडकार व किशोर कुडे हे दोघेजण रोजच्या प्रमाणे आपल्या शेताकडे चारा चारण्याकरिता नेले. पावसाचे दिवस असल्यामुळे अचानक दुपारी आभाळ झाले. अश्या वेळेस त्या दोघांनी घराकडे येण्याचे ठरविले. मात्र घराकडे येतानाच जोरात विजेचा कडकडाट झाला आणि त्या तीन शेल्यावर वीज कोसळली. अश्यात त्या तीनही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच त्या दोघांनी घरी सांगितले व गावातील सरपंच आणि पोलिस पाटील यांना कळविले. यानंतर जवळच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळविण्यात आले असून, याची काही सरकारकडून आम्हाला मदत मिळावी, अशी विनंती केली आहे.

महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED