रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका!!!

32

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.4जून):-शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका” या अनोख्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो नेहमीच काढतो पण आता तुम्ही रोपटं (झाड) लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो – सेल्फी काढून पाठवायचा. तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला बक्षीस मिळेल. अशी ही भन्नाट कल्पना आहे.

पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, दिवसेंदिवस ग्लोबल वाॅर्मिंगमुळे वाढत असलेलं तापमान, कमी होणारं पर्जन्यमान, रुसलेला वरुणराजा आणि आग ओकणारा सूर्य.. या सर्व समस्यांवर वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे. लोकांना झाडं लावण्यासाठी उद्युक्त करणे हाच या स्पर्धेचा उद्देश आहे.

‘एक रोपटं लावा’ त्या रोपट्यासोबत सेल्फी किंवा फोटो काढून खालील ईमेलवर पाठवावा..
shikshak.dhyey@gmail.com

किंवा व्हाट्स ऍप करा..

7499868046

वरील पैकी सेल्फी एकाच ठिकाणी पाठवावा.

ही स्पर्धा निःशुल्क असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेचे नियम व अटीं वाचण्यासाठी https://www.shikshakdhyey.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.

या मोहिमेचा उद्देश झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा असून निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप स्पर्धा घडवून आणून प्रत्येक माणसाच्या मनात झाडं लावण्याचा विचार रुजवण्याचा असल्यामुळे या स्पर्धेत राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक यांनी उत्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन शिक्षक ध्येयचे मुख्य संपादक मधुकर घायदार, कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, मिलिंद दीक्षित, वर्धा, डी.जी. पाटील, संदीप बेलदार, विजय अहिरे, पुरुषोत्तम पटेल नंदुरबार, कविता चौधरी, भाग्यश्री पवार, जळगाव, अशरफ आंजर्लेकर, रत्नागिरी, कैलास बडगुजर, ठाणे, मंजू वानखडे, अमरावती, डॉ. माधव गावीत, सतीश बनसोडे, राजेंद्र लोखंडे, नाशिक, प्रवीण घाडगे, सातारा, कांबळे एस.जी. पाटोडेकर, लातूर, खुशाल डोंगरवार, भंडारा, संगीता पवार, मुंबई, संजय पवार, रायगड, महेन्द्र सोनवाने, गोंदिया, किरण काळे, पुणे, आनंद जाधव, बिदर, कर्नाटक यांनी तसेच सर्व राज्यस्तरीय संपादकीय मंडळाने केले आहे.