कुही (वन्यजीव) वनपरीक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

11

✒️कुही(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कुही(दि.5जून):- उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्यातील कुही (वन्यजीव) वनपरीक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टिनपटे महाराज देवस्थान, गौतम विद्यालय डोंगरमौदा समोर वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टी बद्दल जागरूक केले जाते. ज्यांचा वनाशेजारील गावकरी आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि द्रष्टीकोन देतो.

वृक्षारोपण कार्यक्रमांस श्रीमती ए. जे. उके, वनपरीक्षेत्र अधिकारी कुही वन्यजीव, श्री. सुरेश नौकरकर सरपंच ग्रामपंचायत डोंगरामौदा, श्री. संजय भोतमांगे पोलीस पाटील डोंगरमौदा, श्री. सुगंचद नौकरकर अध्यक्ष ई. डी. सी. डोंगरामौदा, वनपाल रानबोडी, वनरक्षक चिकना, वनरक्षक रानबोडी उत्तर, वनरक्षक धामना, वनरक्षक वेळगाव दक्षिण, वनरक्षक मरूपार, वनरक्षक वेळगाव उत्तर, इत्यादीसह टिनपटे महाराज देवस्थान मंडळी, ईडीसी सदस्य, गावकरी मंडळी, तसेच महेश पडोळे उपस्थित हॊते.