संचारबंदी काळात कृषी निविष्ठाची दुकाने सुरु राहणार-जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड

27

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223

नंदुरबार (दि.22जुलै): जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार नगरपालीका/नगरपंचायत क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या कडक संचारबंदीच्या काळात चारही नगरपालीका/नगरपंचायत क्षेत्राच्या ठिकाणी शेतीशी निगडीत खत व बी-बियाण्यांची दुकाने सकाळी 7 ते 12 या वेळेत सुरु राहतील.

चारही शहरात असलेल्या बँकाच्या आस्थापना नियमित वेळेत सुरु राहतील, तथापी बँक ग्राहकांसाठी बंद राहतील. गॅस एजन्सी मार्फत केवळ घरपोच गॅस सिलेंडर पोहोचविण्यास मुभा राहील.

नंदुरबार जिल्ह्यातील रनाळे,विसरवाडी,खांडबारा,प्रकाशा,खापर,मोलगी या ग्रामीण भागात लोकसंख्या अधिक असल्याने तसेच कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने या गावातील सर्व आस्थापना, दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास मुभा राहील.

ज्या ठिकाणी गर्दी होईल अथवा सामाजिक अंतराचे नियम पाळले जात नसतील त्या ठिकाणी संबधित ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासनाकडून तात्काळ दुकाने बंद करण्यात येतील. संचारबंदी कालावधीत प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील. आदेशाचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिलेल्या आदेशात नमुद केले आहे.