शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा ताफा बंजारा ब्रिगेडच्या वतीने अडविला; बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी नागरिक आक्रमक

35

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.5जून):-अन्न औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे रविवार (ता.४) रोजी गेवराईच्या दिशेने येत असताना त्यांच्या गाडीचा ताफा संभाजीनगर – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर बंजारा ब्रिगेडच्या वतीने अडविण्यात आला व बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नाचा पाढा त्यांच्या समोर वाचून दाखविण्यात आला. मंत्री राठोड यांनी दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवू असे आश्वासन दिल्यानंतर गाड्यांना मार्ग मोकळा करण्यात आला. वि.जा.अ. (प्रवर्गातील) राजपूत भामटामधील भामटा हा शब्द वगळण्यात येऊ नये, लोणाळा तांडा, भवानीआई तांडा, मारफळा पवार तांडा, खुळखुळी तांडा,

मारगादेवी तांडा यांच्यासह गेवराई तालुक्यातील अनेक तांड्यांच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवणे तसेच इतर तांड्यांच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवणे, गेवराई तालुक्यातील सर्व तांडा-वाडा-वस्त्यांना तात्काळ मूलभूत सुविधा पुरविणे, बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करणे, लोणाळा तांडा येथील रेशन दुकानाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा या अशा विविध प्रलंबित मागण्या मंत्री राठोड यांच्यासमोर मांडण्यात आल्या. मंत्री राठोड यांनी दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवू असे आश्वासन दिल्यानंतर गाड्यांना मार्ग मोकळा करण्यात आला.

यावेळी बंजारा ब्रिगेडचे राष्ट्राध्यक्ष रविकांत भाऊ राठोड, बंजारा शिक्षण सेवा अभियानचे प्रचारक रमेश महाराज पहरादेवीकर, बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब राठोड, छत्रपती संभाजीनगर विभागीय सचिव छगन पवार, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष मुकेश भाऊ राठोड, जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर संतोष राठोड, बीड जिल्हा उपाध्यक्ष विनायक चव्हाण, रोहित जाधव आदींची उपस्थिती होती.