चिमुर प.स.चे विस्तार अधिकारी,भिसी ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच ए.सी.बी चा जाळ्यात

    45

    ?30 हजार रुपयांची लाच स्वीकारली

    ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमुर(दि.22जुलै):-पंचायत समिती चिमूरचे विस्तार अधिकारी (पंचायत) हेमंत लक्ष्मण हुमने (वय55वर्ष),भिसी येथील सरपंच सौ. योगिता अरुण गोहणे (वय34वर्ष),उपसरपंच लीलाधर प्रभाकर बनसोड (वय45वर्ष) यांना 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर चे पथकाने पकडले.सदर गुन्ह्याची नोंद चिमुर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

          या प्रकरणातील तक्रारदार यांना ग्रामपंचायत भिसी येथे ग्रामसेवक असतांना ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या ई-टेंडरीग ची प्रक्रिया बरोबर राबविण्यात आली नाही असा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आले होते.या प्रकरणाची चौकशी चिमूर येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हेमंत हुमने यांचे कडे सुरू आहे. या तक्रारीतून नाव मागे घेण्याकरिता हुमने यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याकरिता भिसीचे सरपंच सौ. गोहणे व उपसरपंच लीलाधर बनसोड यांनी तक्रार दारास अपप्रेरणा दिली. आज (दि.22जुलै)रोजी लाच स्विकारताना कडण्यात आले व तिघांही विरुद्ध चिमुर पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद करण्यात आली.