कोलारी-बेलगाव नादिघाटावरील अवैध रेती उत्खनन तात्काळ बंद करा – संभाजी ब्रिगेडची मागणी

38

🔺रेतीघाटामूळे दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणा बाबद तहसीलदारला स्मरण पत्र

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6 जून):-कोलारी-बेलगाव नदी कीनारी वसलेले दोन गाव यांच्यावर निसर्गाचा तसा आशीर्वाद पण महसुलासाठी शासन दरबारात नदीघाटांचा काढलेला लिलाव हा शासनाला जरी महसूल मिळवून देत असला तरी त्याची झळ मात्र सामान्य लोकांनाच सोसावी लागते हे तितकंच खरं. नेमकं झालं तसच शासनाने मागील वर्षी रेतीघाट लिलावात काढले आणि भरपूर महसूल शासनाला प्राप्त झाला.पण उपसा केलेली रेती वाहतूक जळ वाहनांच्या माध्यमातून नेल्या गेली आणि ग्रामीण विभागातील रस्त्यांची तिरडी तयार केली गेली,रस्त्यांची इतकी दुरावस्था की दुचाकी चालवणे अवघड,दुरावस्था झालेल्या रस्त्याने जायची सोय राहली नाही.

8 महिन्यापूर्वी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष सुरज तलमले व टीमने मिळून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी प्रशासनास केली होती पण अद्याप त्याच्यवर कुठल्याही प्रकारची कारवाही झालेली नाही.अजूनही रस्ता जस्याच तसे फुटलेल्या अवस्थेत आहे.त्याच्यात भर पुन्हा हल्ली कोलारी-बेलगाव दोन्ही रेतीघाटांमधून रात्र-दिवस अवैध रेती उत्खनन सुरू आहे,या रेती तस्करीमुळे शासनाचा महसुल बुळवला जात आहे,आणि या अवैध रेतीतस्करीमुळे गावातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.अवैध रेती तस्करीच्या जळ वाहतुकीच्या ये-जा मूळे रस्त्याचे पुन्हा तीन तेरा झाले आहेत,व येणाऱ्या पावसाच्या मोसमात रस्त्याची इतकी दुरावस्था झालेली असेल की नागरिकांना जा-ये कठीण होईल.

यदाकदाचित या रस्त्यामुळे कुणाचं अपघात झाल आणि कुठली जीवित हानी झाल्यास याला पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल अस्या पद्धतीचे निवेदन आणि 8 महिन्याआधी दिलेल्या निवेदनावर कुठल्याही प्रकारची कारवाही प्रशासनाकडून झालेली नाही याचे स्मरण पत्र संभाजी ब्रिगेडचे ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष व कोलारी गावचे नागरिक सुरज तलमले यांच्या मार्फत देण्यात आले त्या प्रसंगी कोलारी येथील नागरिक व युवा आघाडी BRSP ब्रम्हपुरीचे उपाध्यक्ष किशोर प्रधान ,नरेश चौधरी सामाजिक कार्यकर्ता,विश्वास हुमने,गोपी बावणे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड कोलारी,दीक्षित बागडे,विकास चौधरी,गणेश तलमले,सुरेश सूर्यवंशी,इत्यादी उपस्थित होते.